टीम मंगळवेढा टाईम्स।
वाहनचालकाला कामाची दिलेली उचल मागितल्याच्या कारणावरून मुबीन अब्बास शेख (वय २४) या पानशॉप चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पाय धरून ओढत नेवून जखमी केल्याप्रकरणी
गणेश कुराडे, प्रतिक होडगे, विशाल उर्फ भैय्या हजारे, शिवाजी खंकाळ, नाना जगताप,उदय (पूर्ण नाव माहित नाही) या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी मुबीन शेख हे व्यवसायाने पानशॉप चालक असून त्यांच्याकडे इर्टिका चार चाकी वाहन आहे.हे वाहन भाडेतत्वार चालू असते.
सदर वाहनावर चालक नसल्याने मागील चार महिन्यापुर्वी चालक भागवत भारत कोडगर (रा.बठाण) यास चालक म्हणून कामावर ठेवले होते.
सदर कामाची उचल म्हणून फिर्यादीने ४५ हजार रुपये दिले होते. उचल घेतल्यानंतर दोन दिवस चालक कामावर आला नसल्याने मोबाईलवरून आरोपी गणेश कुराडे ( रा. जगदाळे गल्ली) याने
फोन करून सांगितले की, भागवत कोडगर हा माझे वाहनावर चालक म्हणून आहे. त्यास तुझे वाहनावर कामास का ठेवले. तू कामावर तु ठेवू नको, नाहीतर मी तिथे वाहन ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे.
४५ हजार मधील १५ हजार दिले उर्वरीत ३० हजार रुपये परत देतो असे सांगून कोडगने फिर्यादीच्या वाहनावरील काम सोडले होते.
दि.९ रोजी ११.०० वा चालक कोडग यास उर्वरीत पैशाची मागणी केली असता संध्याकाळी देतो असे सांगितले. वरील आरोपीने उर्वरीत ३० हजार रुपये का मागतो असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून हाताने,
लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पाठीवर, मांडीवर मारून रस्त्यावर खाली पाडून पाय धरून रस्त्यावरून ओढत नेल्याने उजव्या हाताच्या कोपऱ्यावर जखम झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज