mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोफत वीजच कारभार आंधळा ठरणार असल्याची भीती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मोफत वीजच कारभार आंधळा ठरणार असल्याची भीती


मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-

दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर महाराष्ट्रात ग्राहकांना 100 युनिटपर्यत दरमहा मोफत वीज देण्याची योजना राज्य सरकारने मांडली आहे. मात्र, यामुळे 7 हजार 100 कोटींचा अतिरिक्त भार येणार आहे. तसेच, योजनेचे अनुदान नागरिकांच्या खात्यावर वेळेवर जमा न झाल्यास सर्वसामान्य ग्राहक भरडला जाणार आहे. त्यामुळे हा कारभार आंधळा ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

दिल्लीतील केजरीवाल सरकारने नागरिकांसाठी अनेक आकर्षक योजना राबविलेल्या आहेत. यामध्ये, दिल्लीकरांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देणारी योजना यशस्वीपणे राबवली.

याच धर्तीवर महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरपर्यत 100 युनिटपर्यत वीज मोफत देण्याचा प्रस्ताव आठवड्यापूर्वी मांडला. परंतु, या योजनेमुळे वीज बिले भरण्याकडे ग्राहकांचा कल कमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्यस्थितीत राज्य सरकारने मोफत योजनेचा प्रस्ताव मांडला असून त्याचे निकष ठरवण्यात आलेले नाहीत.


असा आहे दिल्ली पॅटर्न…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ग्राहकांना 200 युनिटपर्यंत वीज बिल पूर्ण माफ करणारी योजना अंमलात आणली. त्यापुढील 201 ते 400 युनिटपर्यंतच्या वीज बिलावर 50 टक्के अनुदान दिले आहे. ही 50 टक्के सवलत बिलाच्या रकमेवर नसून वीज वापराच्या युनिटवर देण्यात आली आहे. म्हणजे, ग्राहकांचे जेवढे युनिट वापरात आले आहे, त्याच्या 50 टक्के सवलत दिली आहे. पण, महाराष्ट्रात ही योजना आतबट्ट्याचा व्यवहार ठरण्याची भीती आहे.

100 युनिट वापरणारे दीड कोटी ग्राहक…
राज्यात 100 युनिटपर्यंत वीज वापरणारे सुमारे दीड कोटी घरगुती ग्राहकांची संख्या आहे. सरकारच्या योजनेनुसार या ग्राहकांना मोफत वीज देण्याची महावितरणची आर्थिक स्थिती नाही. नियमानुसार मोफत विजेचा भरणा राज्य सरकारने दरवर्षी महावितरणाला आगाऊ करणे बंधनकारक असते. त्यामुळे, या गोंधळात आर्थिक स्थिती कोलमडण्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

अनुदानाची अंमलबजावणी होणार का?
केंद्र व राज्य सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांचे अनुदान नागरिकांच्या खात्यावर जमा होते. मात्र, बहुतांश योजनांचे अनुदान वेळेवर होत नसल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या योजनेचेही अनुदान खात्यावर जमा होणार का? अशी शंका आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा