mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

थकीत रक्कम न चुकवल्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
थकीत रक्कम न चुकवल्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सर्वोच्च न्यायालयाने सरकारची थकित रक्कम न चुकवल्यामुळे टेलीकॉम (दूरसंचार) कंपन्यांना जबरदस्त चपराक लगावत 17 मार्च, 2020 पर्यंतची वेळ दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात 14 फेब्रुवारी, 2020 रोजी केसची सुनावणी करताना वोडाफोन आयडिया आणि एअरटेल यांना सूचित केले आहे की 17 मार्च पर्यंत रक्कम न भरल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल.

याआधी न्यायालयाने वोडोफोन आयडिया आणि एअरटेलसह दूरसंचार कंपन्यांना सरकारचे 920 अब्ज रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. एजीआरचे पैसे न भरल्यास अवमान झाल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.


सरकारकडे पैसे भरण्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्या याचिकेला फेटाळून लावत खंडपीठाने त्यांना सुनावले आहे. न्या. अरुण मिश्रा म्हणाले, ‘हा न्यायालयाचा अवमान आहे. इतकेच नाही तर 100 टक्के कोर्टाचा अवमान आहे. ‘हिंदुस्थानातील दूरसंचार क्षेत्रात वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि रिलायंस जियो यांची एकूण 90 टक्के हिस्सेदारी आहे. एअरटेल आणि वोडाफोनने न्यायालयाच्या निर्णयानंतर चिंता व्यक्त करत कंपन्यांसमोर मोठे संकट उभे राहील अशी चिंता व्यक्त केली होती.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता वोडाफोन आयडियावर अस्तित्वाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच वोडाफोन आणि आयडियावर 3.9 अब्ज रुपयांचे कर्ज आहे. खंडपीठाने सांगितले आहे की कंपन्या आणि दूरसंचार विभागाला अवमान प्रकरणी जबाबदार ठरवले पाहिजे. ‘सर्वोच्च न्यायालय बंद करावे का? देशात कायदा व्यवस्था उरली आहे का?’, असा सवाल न्यायालयाकडून करण्यात आला आहे. न्या. मिश्रा यांनी सांगितले की, ‘आम्ही सर्वांच्या विरोधात अवमाना खटला चालवू’.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वोडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळत आहे. यावर्षी गुरुवारपर्यंत कंपनीच्या व्हॅल्युएशन 27 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. दरम्यान. प्रतिस्पर्धी रिलायंस जियोने 31 जानेवारी 2020 पर्यंत एजीआरशी निगडीत 195 कोटी रुपये दूरसंचार विभागाकडे जमा केले होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

साताऱ्यात महिलेस ब्लॅकमेल करून बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा