टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 58 जणांना उपचारानंतर घरी सोडणेत आलेले आहे.
आज दि.25 सप्टेंबर रोजी 8 नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.तसेच आज 47 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 47 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 13 आणि निगेटिव्ह 34 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा 6 , चोखामेळानगर 1 , मरवडे -1 , उचेठाण 1 , निंबोणी 1 , रडडे 3 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 4 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर येथील कोरोना रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 104 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 585 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 496 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
17 corona were found today on mangalwedha; On the total number 1104
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज