mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुराला होणाऱ्या पाणीपुरवठयातून दररोज तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाया

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापुराला होणाऱ्या पाणीपुरवठयातून दररोज तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाया

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन:-

सोलापूर शहराला पुरविल्या जाणाऱ्या पाण्यापैकी ३० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच तब्बल सहा कोटी लिटर पाणी दररोज वाया जाते. पाण्याचे दर वाढविण्यापेक्षा वाया जाणारे पाणी आधी थांबवायला हवे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे ११.५ लाख इतकी आहे. दिवसाला प्रति माणशी१०० ते १०५ लिटर इतके पाणी महापालिकेतर्फे शहराला पुरविण्यात येते. विविध स्रोतांच्या माध्यमातून महापालिका १६० एमएलडी पाण्याचा उपसा करते, तर सुमारे १०० एमएलडी पाणी प्रत्यक्ष सोलापूरकरांना मिळते. गळती, औद्योगिक वापर, प्युरिफिकेशन लॉस, पाणी शहराकडे आणताना होणारा काही प्रमाणातील अपव्यय मिळून सुमारे ६० एमएलडी, म्हणजेच सहा कोटी लिटर पाणी वाया जाते.

उजनी धरण ते सोलापूर शहर अशी थेट पाईपलाईन (११० किलोमीटर) ४० टक्के , टाकळी येथील बंधारा ५० टक्के व हिप्परगा तलाव येथून १० टक्के इतके पाणी शहरासाठी वापरले जाते. महापालिकेला प्रत्येक १ हजार लिटरसाठी सरासरी १३ रुपये इतका खर्च येतो. पाण्याची गळती ३० टक्के इतकी असून, सुमारे १० टक्के पाण्याची चोरी होते. नागरिकांसाठी आकारण्यात येणारा पाण्याचा दर हा १००० लिटरमागे ११.२५ रुपये इतका आहे. सध्या सरासरी पाण्याची थकबाकी ही ३.५ कोटी असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी भूसंपादनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यांतील ३३ गावांचे ६३१ गट निश्चित करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होणाऱ्या उजनी ते सोलापूर समांतर दुहेरी जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे प्रत्यक्ष पाईप टाकण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.

11,50,000 सोलापूरची लोकसंख्या
100-105 लिटर पाणी पालिका प्रति माणशीदिवसाला पुरवते
30% पाण्याची गळती
10% पाण्याची चोरी
“11.25-11.70 घरगुती दर (प्रति एक हजार लिटर)
“35.10-37.80 व्यावसायिक दर (प्रतिएक हजार लिटर)
“11,556 अर्धा इंची पाईप असेल, तर वार्षिक दर
“23,108 पाऊणइंची पाईप असेल तर वार्षिक दर
3.5 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत असल्याचे महापालिकेतर्फे सांगितले.
160 एमएलडी पाण्याचा उपसा विविध स्रोतांच्या माध्यमातून रोज पालिका करते

शहरात पाणी आणण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जुने झाले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पाणी गळती होते. या पाईपलाईन दुरुस्तीचा प्रस्ताव जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे.
– संजय धनशेट्टी,
सार्वजनिक आरोग्य अभियंता

शहरात नवी पाईपलाईन गरजेची आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही जुने झाले आहे. नव्या तंत्राने पाणी शुद्ध केल्यास या प्रक्रियेतून जे पाणी वाया जात होते, त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते.
– विलास लोकरे, अध्यक्ष,
सीना-भीमा नदी संघर्ष समिती

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
महिलांवरील अत्याचार हल्ल्यांबाबत दिशा कायदा लवकरच लागू होणार!

महिलांवरील अत्याचार हल्ल्यांबाबत दिशा कायदा लवकरच लागू होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; आश्रमातच…

June 28, 2025

खळबळ! महाविदयालयात परीक्षेस आलेली १९ वर्षीय मुलगी मंगळवेढ्यातून बेपत्ता; ‘या’ वर्णणाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधा

June 28, 2025
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

वाहनधारकांनो! वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही केले, तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार, दरदिवशी होणार ‘एवढा’ रुपये दंड

June 28, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

धर्म आणि जातीच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन; एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा