मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । ट्रक अडवून चालकाला मारहाण करीत जबरदस्तीने पैशाची मागणी केली जात असताना सोडवासोडवीसाठी आलेल्या पोलिसांनाच मारहाण केल्याप्रकरणी एकजणाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
ही घटना बुधवारी ( दि . २६ ) रात्री ८ . २० वाजण्याच्या सुमारास शहरातील नवीन कराड नाका येथे घडली . पिनू ऊर्फ स्वप्नील संताजी ठाकरे ( वय २७ , रा . नागालँड चौक , पंढरपूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नांव आहे . पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , बुधवारी रात्री ठाकरे याने नवीन कराड नाका येथे ट्रक अडविला होता . आपल्या मोटारसायकलला ट्रकचा धक्का लागल्याचा आरोप करून तो चालकाला शिवीगाळ व मारहाण करू लागला . याचबरोबर त्याच्याकडे जबरदस्तीने पैशाची मागणी करीत होता .
हा प्रकार समजल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले . यादरम्यान , पोलीस कर्मचारी अरबाज खाटीक हे सोडवासोडवी करीत असताना ठाकरे याने त्यांच्या शर्टची कॉलर पकडून अश्लिल शिवीगाळ केली . तसेच खाटीक यांच्या मदतीला आलेल्या पोलीस नाईक कांबळे यांनाही त्याने जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या कानावर हाताने मारले . अशा आशयाची फिर्याद पोलीस कर्मचारी खाटीक यांनी दाखल केली आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करे हे करीत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज