mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीण भागात आज 316 पॉझिटिव्ह तर ‘या’ गावातील 12 जणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीण भागात आज 316 पॉझिटिव्ह तर ‘या’ गावातील 12 जणांचा मृत्यू

 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 316 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन 707 जण घरी सुखरूप परतले आहेत. तर कोरोनामुळे आज जिल्ह्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज 2 हजार 497 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 181 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 316 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत 23 हजार 561 जण कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनामुळे 645 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 

कोरोना झाल्यामुळे अद्यापही 6 हजार 70 जण वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या 16 हजार 846 एवढी आहे.

आज ‘या’ गावातील 12 जणांचा मृत्यू

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप येथील 55 वर्षाची महिला, खंडाळी (ता. माळशिरस) येथील 71 वर्षाचे पुरुष, टाकळी रोड पंढरपूर येथील 70 वर्षाची महिला, अनगर (ता. मोहोळ) येथील 50 वर्षाचे पुरुष, दहिटणे (ता. बार्शी) येथील 82 वर्षांचे पुरुष,


तर डाळी गल्ली पंढरपूर येथील 72 वर्षाचे पुरुष, कोळगाव (ता. करमाळा) येथील 58 वर्षाचे पुरुष, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, खैरेवाडी (ता. माढा) येथील 80 वर्षाचे पुरुष, एखतपूर (ता. सांगोला) येथील 75 वर्षांचे पुरुष, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील 80 वर्षाचे पुरुष, येणकी (ता. मोहोळ) येथील 40 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात आज 66 पॉझिटिव्ह


सोलापूर शहरात एकूण टेस्टिंगपैकी 12 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तरीही टेस्टिंगची संख्या वाढलेली नाही. आज शहरात 494 संशयितांमध्ये 66 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर दक्षिण कसबा परिसरातील सोन्या मारुतीजवळील एकाचा 81 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

आशीर्वाद नगर, कल्याण नगर, निर्मल नगर (मजरेवाडी), मोरेश्‍वर अपार्टमेंट (दक्षिण कसबा), शाहीर वस्ती (भवानी पेठ), बॉईज हॉस्टेल (सिव्हिल हॉस्पिटल), रंगभवन, पोलिस मुख्यालय, आत्मविश्‍वास नगर, राजीव नगर, एक नंबर झोपडपट्टी, यतीनखानाजवळ, पापाराम नगर (विजयपूर रोड), सैनिक नगर (डब्ल्यूआयटी कॉलेजजवळ), न्यू पाच्छा पेठ, भारतरत्न इंदिरा नगर, राघवेंद्र नगर (सैफूल), आर्य चाणक्‍य नगर,


तर बालाजी हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), जगदंबा चौक (लष्कर), सहारा नगर, वेदांत रेसिडेन्सी, संजना अपार्टमेंट (होटगी रोड), बाहूबली अपार्टमेंट, अशोक चौक, बुधवार पेठ (सम्राट चौक), भवानी पेठ, अवंती नगर (मडकी वस्ती), चिराग रेसिडेन्सी, लक्ष्मी नगर (बाळे), लक्ष्मी पेठ, द्वारका अपार्टमेंट, सात रस्ता, देशमुख कंपाउंड (बुधवार पेठ), गंगा नगर, यशोधरा अपार्टमेंट (रेल्वे लाईन), शेळगी, शास्त्री नगर, उमा नगरी, 


तर एमआयडीसी रोड, शेटे नगर (लक्ष्मी पेठ), मोदीखाना, प्रेम नगर, सिध्देश्‍वर पेठ, रुबी नगर (जुळे सोलापूर), पाच्छा पेठ, रेल्वे लाईन्स्‌, अभिषेक कॉम्प्लेक्‍स, जुळे सोलापूर, लक्ष्मीनारायण टॉकिजजवळ, सहारा नगर, मड्डी वस्ती (भवानी पेठ), पूर्व मंगळवार पेठ, सिध्देश्‍वर पेठ, राऊत वस्ती, कुमठा नाका, अभिषेक कॉम्प्लेक्‍स व उत्तर सदर बझार येथे आज रुग्ण सापडले आहेत.

Today in Solapur rural area 316 positive and 12 people died in ‘Ya’ village

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? ‘या’ दोन बड्या नेत्यांची गुप्त बैठक

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? 'या' दोन बड्या नेत्यांची गुप्त बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा