मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अनवली ता .पंढरपूर येथील सिध्दनाथ सुर्यवंशी या वृध्द शेतकऱ्याची दुचाकी माचणूर येथून चोरीला गेल्याची तक्रार त्या शेतकऱ्याने मंगळवेढा पोलिसात नोंदविली आहे.
सिध्देश्वर नामदेव सुर्यवंशी यांची स्टार सिटी ही काळया पिवळया पट्टयाची एम एच १३ बी सी ६७८० या क्रमांकाची सिध्देश्वर मंदिराजवळ डिकमळीशेजारी लावलेली दुचाकी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ . ३० च्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुद्दाम लबाडीने त्यांच्या संमतीविना चोरून नेली.
याची फिर्याद त्यांनी पोलिसांत दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द भा . दं . वि . ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना माने हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज