मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पिस्तूल दाखवित असताना ते पिस्तूल खोटे असल्याचे म्हटल्याचा राग आल्याने एकाने मित्रावर गोळीबार केला. ही घटना पिंपरीतील मिलिंदनगर येथे घडली.गुरुप्रीत हरदेवसिंग जावंद (वय 22 रा. यु बिल्डिंग, मिलिंदनगर, पिंपरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सनी परदेशी उर्फ रोकडे (रा. तापकीर चौक, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास जावंद व त्याचा मित्र सिद्धांत सुनील बहोत हे मिलिंदनगर येथे रिक्षात गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याच्याकडे एक पिस्तूल होते. हे पिस्तूल त्याने जावंद याला दाखविले असता हे खोटे असल्याचे जावंद म्हणाला. याचा राग आल्याने आरोपीने जावंद याच्यावर गोळीबार केला. ही गोळी त्याच्या डाव्या खांद्याला लागली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज