मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरात एका मोठ्या रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गाचा रूग्ण आढळला अशी भिती सोलापूर जिल्ह्यात व्यक्त होत आहे. मात्र याला वैद्यकीय क्षेत्रातून कोणताच दुजोरा देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर तो रूग्ण नाशिकचा असून तो तिरूपतीवरून आला होता. आता त्या रूग्णास पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आल्याची अफवा सोशल मिडियावर फिरत आहे.
सोलापुरातील एका मोठया रूग्णालयात न्यूमोनियाचा रूग्ण उपचार घेत आहे. यावरून शहरात कोरोनाचा रूग्ण आढल्याची भिती व्यक्त झाली़ न्यूमोनिया हा आजार कोरोनाच्या अनेक लक्षणापैकी एक असल्याने भिती अधिकच बळावली आहे.
तिरुपतीवरुन दाखल झालेल्या एका रुग्णावर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यास न्युमोनिया असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला असला तरी, या संदर्भात रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रक दिले असून, संबंधित रुग्ण हा न्युमोनियाने ग्रस्त आहे व त्यांच्या विनंतीवरून त्यास पुण्यास हलविल्याचे त्यात म्हटले आहे. तथापि रुग्णालयाच्या अहवालावर कोरोना व्हायरस असा उल्लेख असल्याने गोंधळात आणखीन भर पडली होती.
कोरोना विषाणुमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चीनमधील हुबेई प्रातांतून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग हळूहळू आता जगभरात पसरू लागला आहे. जगातल्या जवळपास 60 देशांमध्ये कोरोना विषाणू पसरला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा संशयति रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रालाही कोरोना विषाणूचा धोका आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज