मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मोटरसायकलसाठी विवाहितेचा छळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी सरस्वती गुंडप्पा साळुखे ( वय – ३७ ) रा . प्लॉट नं . १४० बापुजी नगर , मजरेवाडी , सोलापूर यांचा विवाह दि . १ मे १९९७ रोजी गुंडप्पा तुकाराम साळुखे यांच्यासोबत झाला होता . लग्नानंतर एक वर्ष झाल्यावर फिर्यादीला तुझ्या आई – वडिलांनी आमचा मान पान चांगला केला नाही . आमच्या मुलांना दुसरी मुलीबरोबर लग्न केले असते तर आणखीन जास्त सोने व होंडा मिळाला असता असे म्हणून सासरकडच्या मंडळींनी फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली.
व तसेच आरोपी पती याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मला कामाला जायला मोटार सायकल नाही . तुझ्या वडिलांकडून मोटारसायकल घेऊन दे असे म्हणून सारखे त्रास देत होता . त्यानंतर आरोपी पती याने व्यवसायाकरिता एक लाख रुपये घेऊन ये . असे म्हणून चारित्र्यावर संशय घेत फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . हि घटना दि . १ मे १९९८ ते आज पर्यंतच्या दरम्यान घडली . याबाबत आरोपी पती गुंडप्पा तुकाराम साळुखे , सासरे तुकाराम गुंडप्पा साळुखे , यल्लम्मा तुकाराम साळुखे , नणंद शिवम्मा प्रकाश पवार , रेणुका हनमंतू विटकर , हणमतु यल्लम्मा विटकर सर्व रा . यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भोई हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज