टीम मंगळवेढा टाईम्स । जम्बो कोविड हॉस्पिटलमधून महिला रुग्ण बेपत्ता झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घटना उघड झाली आहे. जम्बो हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांनी आपला विनयभंग केल्याचा आरोपी पीडित महिला डॉक्टरनं केला आहे.
याप्रकरणी दोन्ही डॉक्टरविरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, योगेश भद्रा व अजय बागलकोट अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावं आहेत. फिर्यादी व गुन्हा दाखल झाले डॉक्टर यांची एका खासगी एजन्सीमार्फत जम्बो हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या एक महिन्यापासून दोन्ही डॉक्टर पीडित महिला डॉक्टरला उद्देशून अश्लिल बोलत होते. महिला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष केलं, मात्र, त्यानंतर आरोपींचा त्रास दिवसेंदिवस वाढतच गेला.
याला कंटाळून अखेर पीडित महिला डॉक्टरनं दोघांविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत दोन्ही आरोपी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू झाल्यापासून ते या- ना त्या कारणामुळे चर्चेत आलं आहे. त्यात आता एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी केली जात आहे.
जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता महिला पिरंगुटच्या घाटात!
पुणे येथील जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली 33 वर्षीय महिला अखेर शनिवारी पिरंगुटच्या घाटात सापडली. संबंधित महिला सुरक्षित असून सध्या कुटुंबीयांसमवेत आहे.
प्रिया गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. य संदर्भात बातम्या प्रसारीत झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेचा शोध लागल्याची माहिती समोर आली आहे.
झालं असं की, प्रिया गायकवाड यांना 5 तारखेलाच जम्बो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. पण तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने ही महिला घरचा रस्ता शोधत चुकून पिरंगुटकडे चालत गेली. तिकडेच बेवारस राहत होती. पण ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईनं पोलिसांत देताच माध्यमातूनही यासंबंधीच्या बातम्या प्रसारीत झाल्या आणि अखेर शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध लागला.
पण, या घटनेमुळे जम्बो हॉस्पिटलची नाहक बदनामी झाल्याची खंत पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जम्बो हॉस्पिटलकडून व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यानेच आमचा रुग्ण बेपत्ता झाला होता, असा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. दरम्यान, या घटनेत नेमकं चुकलंय, याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रिया गायकवाड या महिलेला तिच्या आईनं पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केलं होतं. मात्र, जम्बो हॉस्पिटलमधून महिलेला 5 सप्टेंबरला डिस्चार्ज मिळाला होता.
मात्र, तेव्हापासून ही महिला बेपत्ता होती. तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. एवढंच नाही तर जम्बो कोविड सेंटरमधून लेक बेपत्ता झाली म्हणून या महिलेच्या आईन बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. आता प्रिया गायकवाड पिरंगूट परिसरात आढळून आली आहे. ही महिला पिरंगूट परिसरात कशी पोहोचली, अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे प्रिया गायकवाड या महिलेला ससून हॉस्पिटलमधून जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र, बरी झालेल्या प्रिया गायकवाड यांना जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या आईला ‘तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली होती.
मात्र, जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी तिच्या आईनं उपोषणचा मार्ग निवडला होता. प्रिया यांची आई रागिणी सुरेंद्र गमरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं.
Female doctor molested in Pune, shocking type at Jumbo Covid Hospital
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज