mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संत दामाजी कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
संत दामाजी कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चारा छावणीस ऊस गेल्यामुळे कारखाना मोठया संकटात असताना सुध्दा ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुक ठेकेदार व कामगार यांच्या विश्वासावर चांगल्या प्रकारे चालवला असे मत साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.कारखाना कार्यस्थळावर प्रारंभी कारखान्याचे तज्ञ संचालक विजय धानाप्पा माने  व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैष्णवी विजय माने या उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यांत आली.


याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे म्हणाले की,चालु गळीत हंगामामध्ये 1,62,050 लाख मे.टन ऊस गाळप करुन 1,56,800 Ïक्वटल पोती साखरेचे उत्पादन झाले आहे.सरासरी 9.90 टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे.कारखाना चांगल्या  कार्यक्षमतेने चालविल्याने सव शेतकरी बंधु, अधिकारी , कामगार व ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे आभार मानले. 27 व्या गळीत हंगामात कोणत्याही बँकेचे एक रुपयाही कर्ज न घेता कारखाना सुरु केला. कामगार व व्यापा­यांची मोठया प्रमाणात देणी होती कारखाना सुरु होतो की नाही असे वाटत होते. दामाजी कारखाना शेतक­यांचा असल्याने संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करावयाचा नाही असा निर्णय संचालक मंडळांनी घेवून आज संपूर्ण ऊसाचे गाळप करुन सांगता समारंभाचे आयोजन केले आहे.   शेतक­यांचे नुकसान होवू नये म्हणून कमी रिकव्हरीचा ऊस गाळपास आणला. येणा­या भविष्यात कामगारांचे सर्व प्रश्न सोेडविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले  अत्यंत अडचणीच्या काळात कामगारांनी कारखाना चांगल्या प्रकारे चालविल्याने कामगारांना सात दिवसाचा पगार बक्षीस म्हणून जाहीर केला. व्यापा­यांनीही आमच्यावर विश्वास ठेवून माल दिला. असाच आमच्यावर दृढ विश्वास रहावा हीच श्री संत दामाजी चरणी प्रार्थना केली. तसेच पुढील हंगामाकरिता ऑफ सिझनमधील सर्व कामे कामगारांनी वेळेवर पूर्ण करावी असे त्यांनी आवाहन केले.


कारखान्याच्या सभासदांना गुढीपाडवा 2020 करिता  रुपये दहा प्रति किलो दराने प्रति शेअर्स 30 किलोप्रमाणात विक्री करणेत येणारी साखर दिनांक 13/3/2020 पासुन मंगळवेढा व कारखाना साईटवरील साखर वाटप केंद्रावर वाटप करणेत येईल.


पुुढील हंगामासाठी तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र  मोठया प्रमाणात वाढलेले आहे.तसेच उजनी धरणामध्येही पुरेसे पाणी असल्याने पुढील गळीत हंगामामध्ये आपल्या कारखान्यास मोठया प्रमाणात गळीतासाठी ऊस उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे तोडणी वाहतुक ठेकेदार,बैलगाडी व डंपींग ट्रॅक्टर ठेकेदार, वाहन मालक,मुकादम,मजूर यांचा बक्षीस देवून सत्कार करण्यांत आला.
कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये ते म्हणाले की पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊसाचे एकरी टनेज कमी असलेमुळे व गळीतास आलेल्या ऊसापैकी काही प्रमाणात ऊस खराब व निकृष्ठ प्रतिचा असल्याने कारखान्याचा साखर उतारा कमी राहिला. परंतु संचालक मंडळांनी अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थापन केल्याने व त्यास कामगारांनी सहकार्य केल्याने गाळप हंगाम चांगल्या प्रकारे पार पडला.


    कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी हे होते.यावेळी कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप,रामकृष्ण चव्हाण,शिवयोग्याप्पा पुजारी, सचिन शिवशरण, भुजंगा आसबे, बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण नरुटे,अशोक केदार, बसवेश्वर पाटील तसेच चंद्रकांत पडवळे,प्रा.येताळा भगत, कारखान्याचे अधिकारी सुहास शिनगारे, रमेश गणेशकर, रमेश पवार, दगडू फटे, संतोष माळवदे,आप्पासोा शिनगारे, लक्ष्मण बेदरे, विजय देशमाने, प्रकाश पाटील, विश्वास पवार,  बँक तपासणीस दिलीप पाटील, विठ्ठल गायकवाड,   उत्तम भुसे, सर्व कर्मचारी,सभासद,शेतकरी, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


हा गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी कारखान्याचे सभासद,शेतकरी, अधिकारी,कर्मचारी तोडणी वाहतुक ठेकेदार, बैलगाडी मुकादम, ऊस तोडणी मजुर, सिझन कंत्राटी कामाचे ठेकेदार यांनी मोलाचे सहकार्य केले.या सर्वांचे मोठे योगदान मिळालेले आहे. कार्यक्रमाचे शेवटी सर्व उपस्थितांचे आभार संचालक सुरेश भाकरे यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaRecent News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
आमदारसाहेब ‘या’ प्रश्नांची सुध्दांची उत्तरे द्याल का ? माऊली हळणवर

आमदारसाहेब 'या' प्रश्नांची सुध्दांची उत्तरे द्याल का ? माऊली हळणवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा