मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गाडीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी वृध्दाच्या हातातील पिशवीमधून लांबवत त्यामधील पाऊणे दोन लाख रुपये चोरल्याची घटना सदर बाझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
याबाबत प्रकाश राजाभाऊ सातपुते ( वय ६५ , रा . पद्मा नगर , प्रथमेश्र्वर अपार्टमेंट , यल्लालिंग मठाजळवळ ) यांनी फिर्याद दिली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , प्रकाश सातपुते यांनी जागेच्या खरेदीसाठी बँकेतून एक लाख पंच्च्याहत्तर हजार रुपये काढले होते . आणि ते कामानिमित्त रजिस्टार ऑफिसमध्ये गेले होते . तेथील काम संपवून ते आपत्कालीन रस्त्यावरून घरी जात होते.
यावेळी त्यांच्या पाठीमागुन काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून आलेल्या दोन चोरांनी लाईटच्या खांबाजवळ प्रकाश सातपुते यांच्या गाडीच्या हॅन्डेलला अडकवलेली पिशवी जबरदस्तीने ओढून चोरून घेऊन गाडीवरून धूम ठोकले . ही घटना गुरूवार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली . या पिशवीमध्ये त्यांचे महत्वाचे कागदपत्रे होती याच बरोबर १ लाख ७५ हजार रुपये चोरून नेले . यामुळे प्रकाश सातपुते यांनी सदर बाझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याचा तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर चानकोटी हे करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज