मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ बेरड गल्लीतील संजय अनिल चव्हाण याने अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,संजय अनिल चव्हाण (वय २२) याने शुक्रवार दि.२० मार्च रोजी सायंकाळी ७.३० चे पुर्वी कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे राहते घरी कोणी नसताना दरवाजा आतून बंद करून घराच्या पत्र्याखालील लाकडी वाशाला साडीने गळफास घेवून तो मयत झाला.
अशी खबर त्याचे चुलते काका गौरीहर चव्हाण यांनी मंगळवेढा पोलिसांत दिली आहे.
जाहिरात :
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज