मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्हा परिषदेची आज मंगळवारी होणारी अंदाजपत्रकीय (बजेट) सभा रद्द करण्यात आली असून अंदाजपत्रक मंजुरीचे अधिकार सीईओ द्यावेत,असे पत्र जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहे. जि.प.ची अंदाजपत्रकीय सभा २७ मार्चपूर्वी घेणे गरजेचे आहे.
मात्र कोरोनामुळे आज २४ मार्च रोजीची सभा रद्द करण्यात आली आहे.जि.प.चे स्वउत्पन्नाचे २०१९ – २० चे अंतिम व २०२० – २१ चे मूळ अंदाजपत्रक शासन नियमानुसार २७ मार्चपूर्वी मंजूर होणे आवश्यक आहे . सर्वसाधारण सभेसाठी सदस्य , पदाधिकारी व अधिकाऱ्यांची संख्या ११० च्या जवळपास आहे . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सभा घेणे उचित ठरणार नाही. सभा घेण्यासंदर्भात आपल्याकडून उचित मार्गदर्शन व्हावे अथवा लोकसभा , विधानसभा , निवडणुकांच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत अंदाजपत्रक मंजुरीचे अधिकार सीईओ दिले जातात . त्याप्रमाणे आताही हे अधिकार मिळावेत असे पत्र सीईओ प्रकाश वायचळ यांनी ग्रामविकासच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज