टीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि रामदास महाराज कैकाडी (जाधव) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने श्री.पवार हे या तिन्ही सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत,अशी माहिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सूत्रांकडून समजली.
माजी आमदार व सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक वर्षे श्री.पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर अनेक वर्षे श्री. पवार यांचे आणि श्री.परिचारक यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. श्री.पवार यांचे जिल्ह्यातील विश्वासू सहकारी म्हणून श्री. परिचारक यांची ओळख होती. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्री. परिचारक यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली.
परंतु तरीही अनेक वर्षे मिळून काम केलेले असल्याने दोन्ही नेत्यांमधील जिव्हाळ्याचे संबंध कायम होते.
परिचारकांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे आणि त्यानंतर नुकतेच रामदास महाराज कैकाडी यांचेही निधन झाले.
राजूबापू पाटील यांचे वडील (कै.) यशवंतभाऊ पाटील यांच्यापासून श्री. पवार यांचे पाटील घराण्याशी संबंध होते. राजूबापू पाटील हेदेखील श्री. पवार यांचे कट्टर समर्थक होते.
रामदास महाराज कैकाडी यांचाही श्री. पवार यांच्याशी चांगला स्नेह होता. पंढरपूरमधील परिचारक, पाटील आणि कैकाडी (जाधव) यांच्यासारखे निकटचे सहकारी गमावल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी श्री. पवार हे आज मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास खास पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत.
आज मंगळवारी दुपारी बारा वाजता पुण्याहून श्री. पवार हे मोटारीने पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे येणार आहेत. कै.राजूबापू पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन नंतर ते दुपारी एक ते दीड या वेळात पंढरपूर येथे कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या वाड्यात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते कैकाडी महाराज मठामध्ये कै.रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत.
दुपारी दोन वाजता श्री. पवार यांचे जिल्हा न्यायालयालगत आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आगमन होईल. दुपारी पावणेतीननंतर श्री. पवार हे मोटारीने बारामतीकडे रवाना होणार आहेत.
सोलापूरसाठी सुरु आहे आग्रह
पुणे पदवीधर मतदारसंघात यावेळेस सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळावे यासाठी शहराध्यक्ष भारत जाधव , कार्याध्यक्ष संतोष पाटील हे पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. प्रवक्ते उमेश पाटील यांना उमेदवारी देण्याचा आग्रह या भेटीत होणार आहे असे पवार यांनी सांगितले.
दहा ऑक्टोबरला सोलापूर दौरा
महाविकास आघाडीतील ऐक्य कायम टिकावे या दृष्टिकोनातून १० ऑक्टोबर रोजी एका शिवसेनेच्या नेत्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खासदार शरद पवार सोलापूर दौयावर येत असल्याचे सांगण्यात आले. या दौऱ्यात जिल्हा परिषद, बाजार समितीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा होणार आहे.
NCP president Sharad Pawar in Pandharpur today; The activists became active, the tour will be like this
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज