मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अज्ञात कारणावरून ६५ वर्षीय वृद्धाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना शनिवार दि. २८ रोजी सकाळी सहाच्या सुमारास धायटी (ता. सांगोला) येथील इंगळे वस्ती येथील दीपक कुरकुटे यांच्या शेतात उघडकीस आली.
आप्पा हरिबा सरगर रा.धायटी असे गळफास घेणाऱ्या वृद्धाचे नाव आहे . धायटी येथील आप्पा हरिबा सरगर यांनी शनिवार २८ रोजी स . ६ वाजण्याच्या पूर्वी दीपक कुरकुटे यांच्या शेताच्या बांधावर लिंबाच्या झाडाला गळफास घेतला होता . मुलगा भगवान सरगर यांनी त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते मयत झाल्याचे सांगितले . याबाबत , भगवान आप्पा सरगर यांनी खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज