टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून शहरातील एका पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 24 झाली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 171 वर गेली आहे.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 20 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 54 जणांना उपचारानंतर घरी सोडणेत आलेले आहे.
आज दि.29 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब (RT – PCR) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज मंगळवारी 176 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 176 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 20 आणि निगेटिव्ह 156 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदरचे नागरिक हे मंगळवेढा 10 , दामाजीनगर 4 , चोखामेळानगर 1 , आंधळगांव 1 , नंदूर 2 , लवंगी 1 , सिध्दापूर 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 171 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 827 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 320 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज