मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बैलाने जोरात धडक दिल्याने रोहित देवकते या बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर मध्ये घडली आहे. रोहितच्या वडीलांच्या छकडा चालविण्याचा व्यवसाय आहे . तर रोहित रिक्षा चालवितो . सध्या लॉकडाऊन मुळे रिक्षा बंद आहेत.
त्यामुळे रोहित छकडा चालवून आपला उदरनिर्वाह करीत होता. रविवारी तो सिमेंट घेवून दाते मंगल कार्यालयाजवळ गेला होता . सिमेंट उतरविल्यानंतर त्याने बैलाला मोकळे सोडले. त्याचवेळी बैलाने त्याच्या छातीत जोरात धडक दिली . छातीत जोराचा मार बसल्याने हॉस्पिटलमध्ये जाई पर्यंत रोहितचा मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज