मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अज्ञात इसमाने हयगयीने फटाके फोडल्यामुळे सोलापूर विमानतळ येथील मुख्य इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेतील गवताला आग लागली आहे . याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची फिर्याद अप्पाराव जाधव ( वय , ५४ वर्षे , भारतमाता नगर , मजरेवाडी , सोलापूर ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना पाच एप्रील रोजी रात्री नऊ वाजता घडली . याबाबत अधिक माहिती अशी की , अज्ञात इसमाने हयगयीने फटाके फोडले व त्याची ठिणगी सोलापूर विमानतळ समोरील गवतामध्ये पडली आणि त्याठिकाणी आग लागली आहे . सदरची आग लागून रन वे व शेजारील लायटिंग यंत्रणा , विमानतळ मुख्य इमारतीला आग लागून नुकसान होण्याचा आणि विमानतळमध्ये कार्यरत असलेले सुरक्षा रक्षकांना दुखापत होईल असे हयगीने वर्तन केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज