मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनामुळे पुण्यात आणखी तिघांचा मृत्यू झाला असून शहरातील बळींची संख्या आठवर पोहोचली आहे. संबंधित तीनही नागरिक स्थानिक असून , कुणीही परदेश प्रवास केला नसल्याचेही समोर आले आहे . पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पाच भागात अधिक कडक निबंध लावण्यात येणार आहेत . पुण्यातील कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच आहे.
सोमवारी एकाच दिवशी पुण्यात नवे ३७ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती . मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा या तीन तासात तीन बळी गेल्याने पुणेकरांच्या काळजाचा ठोका चकला. पण्यातील या तिघांचेही वय सरासरी ६० ते ६५ च्या आसपास असून , त्यांना किडनी , मधुमेह व रक्तदाबाचाही त्रास होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज