मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने याला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा करून नागरिकांना घरात थांबण्यास आवाहन केले आहे.
दरम्यान लोकांनी घरात रहावे यासाठी संचारबंदीही पुकारली असताना नागरिक काही केल्या घरात थांबण्यास तयार नसून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत फिरत असताना मंगळवेढा पोलिसांनी मंगळवार दि.७ एप्रिल रोजी मोकाट फिरणाऱ्या ४३ जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर मुंबई पोलिस अधिनियम कलम ६८ नुसार कारवाई करण्यात आली असून बुधवारपासून पोलिस प्रशासन कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये देशात व राज्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी केंद्र सरकार व राज्य सरकारला या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी कडक धोरण अवलंबावे लागते आहे. नागरिकांनी घरात बसावे असे आवाहन वारंवार शासनाकडून व पोलिस प्रशासनाकडून केले जात असताना मोकाट काही तरूण मंडळी विनाकारण रस्त्यावर येवू पहात आहे.
असाच प्रकार दि . ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ . ०० वा . मंगळवेढा शहरातील सराफ गल्लीत १६ पुरुष फिरत असताना सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव मारकड यांच्या निदर्शनास आले . तसेच हुलजंती येथे सायंकाळी ५ . ०० वाजता २८ पुरुष रस्त्यावर रेंगाळत असल्याचे पोलिस उपनिरिक्षक सचिन खटके यांना दिसून आल्याने वरील ४३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांना मार्गदर्शन करून मुंबई पोलिस अधिनियम कलम ६८ नुसार संबंधितावर कारवाई करण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज