मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । सोलापूरात सोमवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सोलापुरात आज आणखी 5 अहवाल कोरोना पॅाझीटीव्ह आले. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या 390 झाली आहे.
रविवारी रात्री 175 जणांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाचजणांचे रिपोर्ट हे पॅाझीटीव्ह आले आहेत. त्यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
आतापर्यंत एकूण 4274 जणांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 3884 जणांचा अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण 158 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज