टीम मंगळवेढा टाईम्स । सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आज प्राप्त झालेल्या अहवालावरून नविन ५२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे सातारमध्ये कोरोना कहर केला आहे असेच म्हणावे लागेल.
तसेच हे अहवाल विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या रूग्णांचे असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. याचबरोबर वाई येथील एका ६७ वर्षीय कोरोना बाधित रुग्णासह जांभेकरवाडी (ता. पाटण) येथील एका ७० वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज