टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून शहरातील एका पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 25 झाली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 203वर गेली आहे.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 52 जणांना उपचारानंतर घरी सोडणेत आलेले आहे.
आज दि.1 ऑक्टोबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 76 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 76 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 14 आणि निगेटिव्ह 62 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा 5 , दामाजीनगर 3 , गोणेवाडी 2 , भोसे 1 , आंधळगांव 1 , शेलेवाडी 1 , लेंडवेचिंचाळे 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 203 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 940 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 238 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Mangalwedha taluka 25th victim of Corona ;Today, 52 people are corona-free and 14 more
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज