टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिनिधी
दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शिरनांदगी येथील लवान तलावामध्ये पोहोचले असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच मायाक्का गुलाब थोरबोले यांनी दिली आहे.

शिरनांदगी येथील लवान तलावामध्ये पाणी आल्यामुळे आता मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील बऱ्याचशा गावांना पाण्याचा फायदा सुरळीतपणे होणार आहे.

मंगळवेढा तालुक्यासाठी असणारे सदर पाणी हेड टू टेल पद्धतीने सोडण्यात यावे यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगली येथे झालेल्या कालवा संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये आग्रहपूर्वक मागणी केली होती.

केवळ आमदार समाधान आवताडे यांच्या या मागणीची सकारात्मक दखल घेऊन आणि दुष्काळाच्या परिस्थितीचे जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून ना. विखे-पाटील यांनी आवश्यक कार्यवाही करत ही पाणी सोडणे कामी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

या पाण्यामुळे या परिसरातील इतर तलावही भरून घेण्यासाठी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे अशी भावना या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

याप्रसंगी या योजनेतील पाणी या भागात पोहोचल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर त्याचबरोबर इतर स्थानिक पदाधिकारी यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार आवताडे त्यांच्याच वाढदिवसादिवशी पाणी पोहचल्यामुळे जनतेच्या वतीने आगळ्यावेगळ्या शुभेच्छा प्राप्त झाल्या

कायमस्वरूपी दुष्काळी छायेमध्ये असणाऱ्या आमच्या दक्षिण भागाला केवळ मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पाणी प्रश्नसंदर्भात असलेल्या ऊर्जावान भूमिकेमुळे हे पाणी शिरनांदगी तलावामध्ये पोहचले आहे.

केवळ श्रेयवादाच्या लढाईमध्ये आपले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काहीजण उठाठेव करत आहेत परंतु या योजनेबद्दल आणि या भागातील पाणी प्रश्नाबद्दल एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान आवताडे यांनी मागील अनेक वर्षांपासून या योजनेसाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत.

त्यांच्या याच प्रयत्नांची फलश्रुती म्हणून हे पाणी आम्हाला मिळाले आहे. पाणीदार आमदार अशी बिरूदा असणाऱ्या आमदार समाधान आवताडे यांच्यामार्फत त्यांच्याच वाढदिवसादिवशी हे पाणी पोहचल्यामुळे त्यांना या भागातील जनतेच्या वतीने आगळ्यावेगळ्या शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत.- गुलाब थोरबोले, शेतकरी, शिरनांदगी

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











