टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी) :
गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करत लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना मंगळवेढा शहरातील खोमनाळ नाका परिसरात घडली.

दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला असून, या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
अमित पोपट पडवळे (वय २३, रा. खोमनाळ रोड, मंगळवेढा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अमित हे खोमनाळ नाका परिसरात आले होते.

यावेळी तेथे असलेल्या प्रथमेश चव्हाण (रा.जगदाळे गल्ली, मंगळवेढा) याने “तू माझ्या गाडीला कट का मारला?” असा जाब विचारत अमित यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या प्रथमेश चव्हाण याने अमित यांना शिवीगाळ व दमदाटी करत हातातील लाकडी काठीने त्यांच्या डाव्या हातावर जोरदार प्रहार केला.
या मारहाणीत अमित यांच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेनंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घेतले आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
अमित पडवळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रथमेश चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार कांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











