टीम मंगळवेढा टाईम्स / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसह पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर आ. समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सभापती दिपाली ताड यांनी पुढाकार घेत प्रांताधिकारी बी. आर. माळी यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना छोट्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली.

मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्या-वस्त्यांवर शेतकरी कुटुंबे वास्तव्यास आहेत. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.

गावातील मुख्य वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी दूरवरच्या वाड्या-वस्त्यांपर्यंत मोठ्या टँकरने पाणी पोहोचविणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे छोट्या टँकरद्वारे थेट पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी सभापती ताड यांनी केली.

दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता करणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. पशुधन हे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन असल्याने जनावरांच्या चारा-पाण्यासाठीही प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सभापती दिपाली ताड यांनी मांडलेल्या प्रश्नांची प्रांताधिकारी माळी यांनी दखल घेत वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांसाठी छोट्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











