मंगळवेढा टाईम्स न्युज ।
शेतजमिनीचा बांध, हद्दीचा वाद, सातबारा उताऱ्यावरील नोंदी, मालकी हक्क आणि जमिनीच्या ताब्यावरून होणारे वाद… महाराष्ट्रातील गावागावांत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या वादांमुळे अनेक शेतकरी आणि सामान्य नागरिकांना महसूल कार्यालये तसेच न्यायालयांचे उंबरठे झिजवावे लागतात.

वेळ, पैसा आणि श्रम खर्च करूनही अनेक प्रकरणांचा निकाल लागत नाही. मात्र, आता अशा प्रलंबित महसुली वादांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने जमिनीचे वाद सामोपचाराने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ सुरू केले आहे.

१ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत संपूर्ण राज्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महसूल विभागातील विविध स्तरांवर प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे पक्षकारांच्या परस्पर संमतीने आणि तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.

मंडळ अधिकारी ते अपर जिल्हाधिकारी स्तरापर्यंतच्या महसूल यंत्रणेकडील पात्र राज्यात जमिनीच्या मालकी हक्कावरून, प्रत्यक्ष ताब्यावरून, हद्दीवरून तसेच महसुली नोंदींवरून वाद निर्माण होण्याचे प्रमाण मोठे आहे. अनेकदा कागदोपत्री जमीन एका व्यक्तीच्या नावावर असते; मात्र प्रत्यक्ष ताबा दुसऱ्याच व्यक्तीकडे असतो.
काही प्रकरणांत वारसाहक्क, सामायिक मालकी आणि परस्पर संमतीच्या अभावामुळे वाद अधिक गुंतागुंतीचे बनतात. परिणामी, छोट्या वादांचे रूपांतर न्यायालयीन लढाईत होते.

विविध स्तरावर सुनावणी होणार
महसूल विभागातील विविध स्तरांवरील अर्धन्यायिक प्रकरणांचा या अभियानात समावेश करण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी ते अपर जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सुनावणी होणार आहेत. प्रकरणांचा यामध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सुनावण्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक प्रकरणांना मार्ग मिळू शकतो.
जमिनींच्या वादांची प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित
जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद, प्रत्यक्ष ताबा आणि सातबारा नोंदींमध्ये तफावत, शेतजमिनीच्या हद्दी आणि बांधावरून वाद, वारसाहक्क आणि सामायिक मालकीची प्रकरणे, महसुली नोंदी, फेरफार आणि इतर नोंदींवरील आक्षेप, परस्पर संमती नसल्याने न्यायालयात प्रकरणे प्रलंबित आहेत.
तडजोडीतून मिटणार वाद
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे महसूल विभागातील प्रलंबित वाद परस्पर संमतीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षकारांची संमती आवश्यक आहे.
अर्ज, छाननी आणि तडजोडीची प्रक्रिया अशी
तडजोड अर्ज : वादातील संबंधित पक्षकारांनी परस्पर संमतीने प्रकरण निकाली काढण्याची तयारी दर्शवून तडजोडीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे.
छाननी व तडजोडनामा : संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची पात्रता आणि पक्षकारांची संमती तपासून तडजोडीच्या अनुषंगाने कार्यवाही केली जाणार आहे.
अंतिम आदेश: तडजोडीच्या आधारे प्रकरण निकाली काढण्यासाठी नियमानुसार अंतिम आदेशाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













