टीम मंगळवेढा टाईम्स :-
यंदा संपूर्ण राज्याला दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत. पिकांची चिंता, पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अशा अनेक संकटांचा सामना आपला शेतकरी बांधव करत आहे.
अशा कठीण काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होता यावे, या भावनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून यंदाची दिवाळी शेतकरी बांधवांसोबत साजरी करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या समवेत आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथे शेतकरी गोविंद भुजा माने यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करत भगिनींना साडीचोळी व फराळाचे साहित्य सुपूर्द केले.

यावेळी त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांच्या घरातील परिस्थिती समजून घेत दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या सोबत आनंदाचे काही क्षण घालवणे, हा या भेटीमागचा खरा उद्देश होता.

दिवाळीचा आनंद तेव्हाच खरा, जेव्हा तो आपल्या बळीराजाच्या घरापर्यंत पोहोचतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला बळ मिळावं, भाजपा-महायुतीचा शेतकऱ्यांसोबत कायम ठामपणे उभं आहेच; परंतु या दुष्काळाच्या सावटात असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, तसेच प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यात सुख-समाधानाचे दिवस येवोत, हीच मनापासून प्रार्थना केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, प्रांताधिकारी बी आर माळी, तहसीलदार मदन जाधव, सुनिल थोरबोले- पाटील, उपनगराध्यक्ष प्रा.येताळा भगत सर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय साबणे, दादासाहेब दोलतोडे त्याचबरोबर सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ आणि नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत भाजपा व महायुतीचे राज्य शासन शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मदतीचे वितरण सुरू आहे. तांत्रिक अडचणींमुळे मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल. तसेच प्रशासनाला दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा, टँकरद्वारे पाणीपुरवठा यांचे तातडीने नियोजन करण्याची मागणी पालकमंत्री ना.गोरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर म्हैसाळ सिंचन योजना आणि २४ गाव पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.

जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी २४ तास सुरू राहणारी हेल्पलाइन सुरू करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार आहे -आमदार समाधान आवताडे

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











