mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

​”तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो!”… मंगळवेढ्यातून भरदिवसा घरातून अपहरण केलेल्या नवविवाहितेची कर्नाटकात थरारक सुटका नेमकी कशी झाली? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 28, 2026
in क्राईम, मंगळवेढा
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

“नांदायला का येत नाहीस?” असा जाब विचारत अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २७ वर्षीय नवविवाहितेचे माहेरून भरदिवसा जबरदस्तीने चारचाकी गाडीतून अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी येथे घडली आहे.

तरुणीला कर्नाटकातील एका शेतात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी पीडितेचा पती, दीर यांच्यासह चौघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​दत्तात्रय पोपट माने (पती, रा. हंगिरगे, ता. सांगोला), दिलीप पोपट माने (दीर), अजित माने आणि संतोष अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मनिषा रावसाहेब घुटूकडे (वय २७ वर्षे, रा. मानेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

​लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांत वाद

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथील दत्तात्रय माने याच्याशी झाला होता. मात्र, संसार सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाले. त्यानंतर मनिषा या माहेरी मानेवाडी येथे परतल्या आणि तेव्हापासून त्या माहेरीच राहत होत्या.

​हात-पाय धरून जबरदस्तीने गाडीत कोंबले

दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मनिषा यांच्या आई-वडील शेतात कामासाठी गेले होते. मनिषा घरात एकट्याच असताना अचानक घराबाहेर चारचाकी गाडीचा आवाज आला. त्या बाहेर आल्या असता पती दत्तात्रय व दीर दिलीप गाडीतून उतरले. त्यांनी “आई-वडील कुठे आहेत?” अशी विचारणा केली.

मनिषा काही समजण्याच्या आतच पतीने त्यांचे तोंड दाबून हात पकडले, तर दीराने पाय धरून त्यांना उचलले आणि एम.एच. ४५ डी. ४३५४ या क्रमांकाच्या वाहनात जबरदस्तीने कोंबले. मनिषा यांनी आरडाओरडा करू नये म्हणून धावत्या गाडीतही त्यांचे तोंड दाबून ठेवण्यात आले होते.

​कर्नाटकातील शेडमध्ये डांबून मारहाण

आरोपींनी गाडी घेरडी रस्त्याने आडवळणाने नेत कर्नाटक हद्दीतील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये नेली. तिथे खोलीत नेऊन पतीने, “तू माझ्यासोबत असं का केलंस? नांदायला का येत नाहीस? तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो,” अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली. पीडितेचा आक्रोश ऐकून शेजारील एका वृद्ध आजीने मध्यस्थी करत आरोपींना जाब विचारला व मुलीला सोडून देण्यास सांगितले.

​नाकाबंदीत फुटले बिंग; पोलिसांमुळे सुटका

दुपारी ३ च्या सुमारास आरोपी मनिषा यांना गाडीत बसवून इंडीच्या दिशेने घेऊन जात होते. त्याचवेळी रस्त्यावर कर्नाटक पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयित गाडी थांबवून तपासणी केली. संधी साधत मनिषा यांनी तातडीने, “हे लोक माझे जबरदस्तीने अपहरण करून नेत आहेत,” अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत मनिषा यांची सुटका केली आणि त्यांना उमदी पोलीस ठाण्यात आणले.

​घटनेची माहिती मंगळवेढा पोलिसांना दिल्यानंतर मनिषा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दत्तात्रय माने, दीर दिलीप माने यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! ​आधी सोन्याचा खरा मणी दिला, मग मंगळवेढ्यात बोलावून २ लाखांना घातला गंडा; भामट्यांची नवी शक्कल उघड

October 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

३९ गावांच्या पाण्याचा जीव टांगणीला लावणारा प्रश्न एका झटक्यात निकालात; आमदार समाधान आवताडेंचा ‘तो’ मास्टरस्ट्रोक नेमका काय?

October 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, नदीत तस्करांची मनमानी! मंगळवेढ्यात भीमा पात्रातून रातोरात कोट्यवधींची वाळू लंपास; दिवसा शांतता, रात्री थेट दरोडा, कसा चालतोय हा खेळ?

October 26, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास; दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली, फायनान्स कंपनीचा संचालक व कर्मचारी फरार

October 25, 2026
मंगळवेढ्याचे आदर्श शिक्षक सतीश इंगळे सरांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर; ​’सूर्योदय फाऊंडेशन’ तर्फे होणार गौरव

मंगळवेढ्याचे आदर्श शिक्षक सतीश इंगळे सरांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर; ​’सूर्योदय फाऊंडेशन’ तर्फे होणार गौरव

October 25, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात जमिनीच्या वादातून शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण; महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

October 23, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व; ​हा लढा केवळ मतांचा नाही, तर आपल्या पदवीधर मुलांच्या भवितव्याचा; हर्षदा देशमुखांच्या विजयासाठी सिद्धेश्वर रणेंची साद

October 22, 2026

ताज्या बातम्या

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​”तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो!”… मंगळवेढ्यातून भरदिवसा घरातून अपहरण केलेल्या नवविवाहितेची कर्नाटकात थरारक सुटका नेमकी कशी झाली? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

October 28, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! ​आधी सोन्याचा खरा मणी दिला, मग मंगळवेढ्यात बोलावून २ लाखांना घातला गंडा; भामट्यांची नवी शक्कल उघड

October 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

३९ गावांच्या पाण्याचा जीव टांगणीला लावणारा प्रश्न एका झटक्यात निकालात; आमदार समाधान आवताडेंचा ‘तो’ मास्टरस्ट्रोक नेमका काय?

October 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, नदीत तस्करांची मनमानी! मंगळवेढ्यात भीमा पात्रातून रातोरात कोट्यवधींची वाळू लंपास; दिवसा शांतता, रात्री थेट दरोडा, कसा चालतोय हा खेळ?

October 26, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास; दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली, फायनान्स कंपनीचा संचालक व कर्मचारी फरार

October 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..