टीम मंगळवेढा टाईम्स ।
आयुर्वेदिक औषधांची चौकशी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पार्लर व्यावसायिक महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी दोन तोळ्याची सोन्याची माळ खरी असल्याचे भासवून बनावट माळ विक्री करून दाम्पत्याची दोन लाखांची फसवणूक केली.

हा प्रकार २४ ऑगस्ट २०२६ मध्ये घडला. याप्रकरणी, दुर्गा धोंडीराम कुंभार (रा. महाविद्यालयाजवळ, कडलास रोड, सांगोला) यांनी सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली.

फिर्यादी कुंभार ह्या सांगोला महाविद्यालयाशेजारी पार्लर, स्टेशनरी व आयुर्वेदालय नावाने दुकान चालवितात. १३ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास त्या दुकानात एकट्या असताना दोन अनोळखी व्यक्ती आल्या.

त्यांनी आयुर्वेदिक औषधांची चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याकडे विक्रीसाठी सोन्याची माळ असल्याचे सांगून माळेतील एक मणी काढून तपासण्यासाठी दिला.

दुसऱ्या दिवशी सोनाराकडून मणी सोन्याचा असल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित अनोळखी व्यक्तीने फोन करून माळ खरेदी करण्याबाबत विचारणा केली. त्याने पंढरपूर येथे येण्यास सांगितल्यानुसार १८ ऑगस्ट रोजी दुर्गा कुंभार व त्यांचे पती धोंडीराम कुंभार पंढरपूर बसस्थानकावर गेले. तेथे भेटलेल्या व्यक्तीला पैसे नसल्याचे सांगून ते घरी परतले.

त्यानंतर संबंधित व्यक्तीने पुन्हा फोन करून दवाखान्याची अडचण असल्याचे सांगत माळ खरेदी करण्यासाठी लवकर येण्याची विनंती केली. २४ ऑगस्ट रोजी सकाळी त्याने मंगळवेढ्यात येणार असल्याचे सांगितले.
त्यानुसार सायंकाळी पाचच्या सुमारास दामाजीपंत मंदिराशेजारील बंद किराणा स्टोअर्ससमोर दाम्पत्याने त्याला दोन लाख रुपये रोख दिले आणि दोन तोळे सोन्याची माळ घेतली.
मात्र, २५ ऑगस्ट रोजी माळेची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने मंगळवेढ्यात संबंधित व्यक्तीचा शोध घेतला, दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता फोन बंद होता.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










