मंगळवेढा टाईम्स न्युज ।
अंगावरील लग्नाची हळदही उतरण्यापूर्वीच एका नववधूचा संसार संपला. लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी २२ वर्षीय रेश्मा रवींद्र पुजारी हिने सासरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. धायटी (ता. सांगोला) येथे शुक्रवारी (दि. २३) मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रेश्माच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेश्मा (रा. हित्तनळी, ता. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक) हिचा विवाह २०ऑक्टोबर २०२६ रोजी धायटी येथील शिवाजी नवनाथ माडेकर याच्याशी झाला होता.

नव्या आयुष्याची सुरुवात करून सासरी आलेल्या रेश्माच्या आयुष्याचा अवघ्या चार दिवसांत असा दुर्दैवी शेवट झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रेश्मा आणि तिचा पती देवदर्शनासाठी गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ते घरी परतले. त्यानंतर रेश्मासह कुटुंबातील सर्वांनी एकत्र जेवण केले.

रात्री रेश्मा आणि तिची मावस बहीण मल्कम्मा पुजारी घराच्या उजव्या बाजूच्या खोलीत झोपल्या, तर पती शिवाजी घराच्या डाव्या बाजूच्या खोलीत झोपला होता. कुटुंबातील अन्य सदस्य घरासमोरील कट्टयावर झोपले होते.

याप्रकरणी पती शिवाजी माडेकर यांनी शनिवारी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, रेश्माच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
मध्यरात्री झोपेत असताना घडला प्रकार
मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सर्वजण झोपेत असताना रेश्माने घरातील पत्र्याच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास मावस बहिणीच्या रडण्याचा आवाज ऐकून हा प्रकार उघडकीस आला. पती शिवाजी माडेकर याने तिला खाली उतरवले असता तिचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












