mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या ; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली अधिकाऱ्यांना तंबी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या ; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली अधिकाऱ्यांना तंबी

टीम मंगळवेढा टाईम्स । आगामी खरीप हंगामामध्ये बी बियाणांचा तुटवडा पडू देऊ नका. बोगस बियाणांच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पहा आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा. शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे (Uddhav Thackeray on Farmer loan). यातून त्यांनी अधिकाऱ्यांना दर्डावत शेतकऱ्यांबाबत कोणतीही हयगय चालणार नाही, असाच संदेश दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषि खरीप हंगाम कामांचा आढावा आणि बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप, कापूस, तुर व धान खरेदीबाबत आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार येणार नाही यासाठी काळजी घेण्याच्या स्पष्ट सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच बोगस बियाणांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी दिले. याबैठकीत माहिती देण्यात आली की, खरीप हंगामासाठी 43.50 लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती. त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय 50 हजार मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा करण्यात येत आहे.

खरीप हंगाम कामांसह बी-बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता, पिक कर्ज वाटप, तसेच कापूस, तूर व धान खरेदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा. कृषि मंत्री @dadajibhuse , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता आदी सहभागी. pic.twitter.com/URroVH5yKm

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 8, 2020

5 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना बांधावर बियाणे


खते व बी बियाणे बांधावर पुरविण्यासाठी 47 हजार 89 शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. 1 लाख 55 हजार 755 मेट्रिक टन खत, 86 हजार 126 मेट्रिक टन बियाणे , 1 लाख 80 हजार 481 कापूस बियाणे पाकिटे बांधावर देण्यात आली आहेत. एकूण 5 लाख 27 हजार 483 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. एकंदर 381 लक्ष क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. 9 लाख क्विंटल खरेदी राहिली आहे. 18.81 लाख क्विंटल तूर खरेदी झाली असून 2 लाख शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली. 822 कोटी रुपयांचे चुकारे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 18.90 लाख क्विंटल चणा खरेदी झाली असून 15 जुलैपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. याचेही चुकारे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.

‘पिक कर्ज वाटपाला गती द्यावी’


यावेळी बोलताना कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, “पिक कर्ज वाटपाला अधिकाधिक गती देण्याच्या सुचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. बँकांच्या संपर्कात अधिकारी आहेत.” यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण 46 टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांकडून 7 टक्के पिक कर्ज वाटप झाल्याची माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 6250 कोटी, तर राष्ट्रीयकृत बँकांनी 2300 कोटी रुपये पिक कर्ज वाटप केल्याची माहिती त्यांनी दिली. बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचा 22 मेचा शासन निर्णय पोहोचविणे सुरू असून शेतकऱ्यांना पिक कर्जात अडथळा येऊ नये अशा सूचना दिल्याचेही त्या म्हणाल्या.

निसर्ग चक्रीवादळ शेतीचे नुकसान


निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड येथे 4650 हेक्टर जमीन आणि 18 हजार हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीला कृषि मंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव कृषि एकनाथ डवले, प्रधान सचिव सहकार आभा शुक्ला, प्रधान सचिव पदुम व पणन अनुप कुमार, सचिव, अन्न व नागरी पुरवठा संजय खंदारे, व्यवस्थापकीय संचालक, कापूस उत्पादक महासंघ नवीन सोना,आयुक्त कृषि सुहास दिवसे, व्ववस्थापकीय संचालक, महाबीज उपस्थित होते.

there should be no complaint that farmers are not getting crop loans, said the Chief Minister uddhav thakarey

—————————-

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
संकटांचा सामना करण्यासाठी छत्रपतींचा आदर्श घ्या : धैर्यशील मोहिते पाटील

संकटांचा सामना करण्यासाठी छत्रपतींचा आदर्श घ्या : धैर्यशील मोहिते पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 13, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा