मंगळवेढा टाईम्स न्युज ।
जमिनीचा हिस्सा नावावर करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सासू-सासऱ्यांनी सून काजल महेश बंडगर (रा. चिकमहुद, ता. सांगोला) हिला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सासऱ्याने तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या दांड्याने प्रहार केला. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास चिकमहुद येथील बंडगरवाडी नं. १ येथे ही घटना घडली.

काजल हिने १७ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली असून त्यानुसार सासरा लक्ष्मण तात्याबा बंडगर, सासू बायडाबाई लक्ष्मण बंडगर (सासू) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास महेश हे शेतातील कामासाठी गेले असताना काजल या घरात काम करीत होत्या. त्यावेळी सासू-सासरे घरासमोर येऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागले.

तू या घरात राहायचे नाही, इथून निघून जा. तुम्हाला शेतातील हिस्सा देणार नाही. तुला काय करायचे ते कर, असे म्हणत सासूने तिला धमकावले. तसेच, मारहाणीची माहिती पती किंवा नातेवाइकांना सांगितल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन दोघेही तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













