mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 15, 2026
in आरोग्य, राज्य
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

टीम मंगळवेढा टाईम्स ।

किराणा दुकानांमध्ये सुट्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या मसाला पावडर आणि मिश्र मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिले आहेत.

मसाल्यांमधील भेसळ, प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर आणि अस्वच्छ पद्धतीने होणारे उत्पादन रोखण्यासाठी राज्यात कठोर अन्नसुरक्षा अनुपालन आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार मसाला पावडर आणि मिश्र मसाल्यांचे योग्य पद्धतीने पॅकिंग व सीलिंग करूनच वितरण आणि विक्री करणे आवश्यक राहणार आहे.

मसाल्यांच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता, स्वच्छता आणि उत्पादनाचा मागोवा घेता येईल, अशी व्यवस्था बंधनकारक करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

हळद, मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडे, हिंग, गरम मसाला, करी पावडर आणि अन्य मिश्र मसाल्यांच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक व विक्रीशी संबंधित व्यावसायिकांना या आदेशातील लागू तरतुदींचे पालन करावे लागणार आहे. मसाला उत्पादक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते, ई-कॉमर्स व्यवसाय, हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स आणि संस्थात्मक स्वयंपाकगृहांचाही या आदेशात समावेश आहे.

सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध

किराणा दुकानांमध्ये मोठ्या डब्यांमधून किंवा पोत्यांमधून ग्राहकांना सुटी मसाला पावडर विकली जाते. मात्र, अशा विक्रीत भेसळ आणि दूषितीकरणाचा धोका लक्षात घेऊन मसाला पावडर व मिश्र मसाल्यांची विनापॅकिंग विक्री रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित नियमांनुसार मसाल्यांचे योग्य पद्धतीने पॅकिंग आणि सीलिंग करूनच त्यांचे वितरण व विक्री करावी लागणार आहे.

या निर्णयामुळे मसाल्यांची खुली विक्री करणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या विक्री पद्धतीत बदल करावा लागू शकतो. मात्र, आदेशातील नेमकी अंमलबजावणी, लागू असलेले अपवाद आणि संबंधित नियमांची व्याप्ती यानुसार व्यवसायचालकांनी कार्यवाही करणे आवश्यक राहील.

प्रतिबंधित रंग वापरल्यास कठोर कारवाई

मसाल्यांना आकर्षक रंग देण्यासाठी किंवा त्यांचे वजन वाढविण्यासाठी भेसळ केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधित घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मेटॅनिल यलो, रोडामाइन बी, सुदान डाईज आणि लेड क्रोमेट यांसारख्या प्रतिबंधित रंगांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

तसेच विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा, अनधिकृत स्टार्च आणि अन्य परकीय पदार्थ मसाल्यांमध्ये मिसळण्यास मनाई आहे. निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचे मिश्रण करणे किंवा अर्क काढून घेतलेल्या मसाल्यांची विक्री करणे याविरोधातही कारवाई केली जाणार आहे.

रस्त्यावर मसाले वाळविण्यास मनाई

मसाल्यांचे उत्पादन, प्रक्रिया आणि साठवणूक करताना स्वच्छतेचे कठोर निकष पाळावे लागणार आहेत. सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारे, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्यांजवळ मसाले वाळविण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्पादन व साठवणूक परिसर स्वच्छ, कोरडा आणि कीडमुक्त ठेवणे आवश्यक राहील.

मसाल्यांसोबत रसायने, कीटकनाशके, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठविण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी इथिलीन ऑक्साइडचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, केवळ कायदेशीररीत्या अनुमत प्रक्रिया वापरण्याचे निर्देश आहेत.

केवळ व्यापारी परवाना पुरेसा नाही

मसाल्यांचे उत्पादन किंवा दळण प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिकांकडे व्यवसायाच्या स्वरूपानुसार वैध FSSAI परवाना अथवा नोंदणी असणे आवश्यक आहे. केवळ व्यापारी परवान्याच्या आधारे मसाल्यांचे उत्पादन किंवा दळण करता येणार नाही. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, वैद्यकीय तंदुरुस्ती आणि आवश्यक प्रशिक्षण यावरही भर देण्यात आला आहे.

पाकिटावर संपूर्ण माहिती देणे बंधनकारक

मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनाचे नाव, घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, FSSAI परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन किंवा पॅकिंग दिनांक आणि लागू नियमानुसार वापराची अंतिम मुदत अथवा ‘बेस्ट बिफोर’ यांसारखी माहिती नमूद करावी लागणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026

ताज्या बातम्या

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा