मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील खरीप पिके संकटात सापडली असताना, उजनी कालवा क्रमांक ४८ मधून गळतीद्वारे पाणी कर्नाटकातील शिरढोणच्या दिशेने वाहून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून पिकांना पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कात्राळ-कर्जाळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पाटबंधारे विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

उजनी कालवा क्रमांक ४८ च्या शेवटच्या टोकाला कात्राळ, कर्जाळ आणि हुलजंती ही सीमावर्ती गावे येतात. मात्र, कर्जाळ परिसरातील कालव्याच्या भरावाला गळती लागल्याने पाणी कर्नाटकातील शिरढोण येथील ओढ्यातून वाहून जात असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.

याबाबत संबंधित विभागाला कळवूनही तातडीने उपाययोजना झाल्या नसल्याची तक्रार आहे. पावसाने ओढ दिल्याने पिकांना पाण्याची गरज असताना शिवसेनेचे राजकुमार स्वामी यांच्या आंदोलनानंतर बोराळे आणि नंदूर परिसरातील तलाव भरून देण्यात आले. मात्र, कात्राळ-कर्जाळ परिसरातील तलाव अद्याप पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

काय म्हणतात शेतकरी
दरवर्षी कालव्याच्या भरावाची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत असतानाही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

गळतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर काम करण्यात येईल, असे शाखा अभियंता नागेश जडे यांनी सांगितले.
पावसाने ओढ दिली, उजनी 3 भरलेली असतानाही पाणी मिळत नाही. पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई कोण देणार? असा सवाल विकास सोसायटीचे संचालक प्रकाश माने यांनी उपस्थित केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










