मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नागरिकांची प्रलंबित व अत्यावश्यक कामे वेळेत होत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या या मनमानी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात येत्या १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता भूमी अभिलेख कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

तालुक्यातील सर्व अन्यायग्रस्त नागरिकांनी व शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक अजित जगताप यांनी केले आहे.

कार्यालयात विविध कामांसाठी अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना महिनोनमहिने हेलपाटे मारावे लागत आहेत. कामाच्या प्रगतीबाबत विचारणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची आणि टाळाटाळ करणारी उत्तरे दिली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

नागरिकांच्या अर्जांची कोणतीही वेळेत दखल घेतली जात नसून, सर्वसामान्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कामातील विलंबासोबतच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधांचाही मोठा अभाव आहे. येथे येणाऱ्या वृद्ध, महिला व शेतकऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय उपलब्ध नाही. प्रशासनाचा हा असंवेदनशील कारभार आता चव्हाट्यावर आला आहे.

नागरिकांच्या प्रलंबित कामांचा तात्काळ व कालमर्यादेत निपटारा व्हावा आणि कार्यालयातील कारभारात सुधारणा व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येत आहे.
जोपर्यंत समस्या मार्गी लागत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा देत अजित जगताप यांनी तालुक्यातील नागरिकांना एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










