मंगळवेढा टाइम्स न्युज ।
मंगळवेढा तालुक्यातील येड्राव येथील तीन तिकटणे चौकात तहसीलदारांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून रविवारी रात्री दोन तरुणांवर चाकूने हल्ला करण्यात आला, ज्यात शंकर राजेंद्र काळे व राहुल धुळा काळे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल धुळा काळे (वय २७, रा. येड्राव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक संभाजी काळे, आशिष संभाजी काळे, महेश दौलत माने, पांडुरंग आबा माने, प्रशांत देवकते, बापू आण्णासाहेब माने, प्रभाकर माने व दत्ता कोळेकर (सर्व रा. येड्राव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी रात्री राहुल काळे हे त्यांचे चुलत भाऊ शंकर राजेंद्र काळे व अन्य चौघांसोबत तीन तिकटणे चौकात बोलत बसले होते. यावेळी तेथे आलेल्या दीपक काळे याने शंकर काळे यांच्याकडे पाहून, “याने माझी तक्रार तहसीलदारांकडे केली आहे, याला आता सोडायचे नाही,” असे म्हणत हातातील चाकूने शंकर यांच्या डोक्यात वार केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर आशिष काळे यानेही चाकूने शंकर यांच्या हनुवटीखाली व ओठावर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच राहुल काळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर चौकात गर्दी जमल्याने संशयित तेथून निघून गेले. त्यानंतर राहुल व शंकर काळे यांना त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी उपचारासाठी मंगळवेढा येथे आणले. याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











