मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा- विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर मरवडे गावाच्या बाहेरून बायपास महामार्ग करावा या मागणीसाठी आंदोलन करून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी 35 जनावर गुन्हे दाखल केले.

या प्रकरणात सविस्तर हकीगत अशी की 18 ऑगस्ट रोजी 10.30 वा. ते 11.30 वा.चे दरम्यान मरवडेतील शिवाजी चौक येथे मंगळवेढा ते विजयपूर जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. 561-A वर मरवडेतील संतोष गणपाटील,हैदर केंगार,श्रीकांत गणपाटील, आनंदा बनसोडे, अनिल गणपाटील,रणजित पवार, सोमनाथ टोणपे, सतिश शिंदे, नितीन घुले,

शिवाजी पवार, रतीलाल केंगार, सागर काकेकर, माणिक घुले, महेश घुले, अमोल घुले, निवृत्ती जाधव, उमेश येडशे, निरंजन गणपाटील, गणपत शिवशरण, महेश पवार, नानासाहेब जाधव, महेश कांबळे, नंदकुमार जाधव, निखिल कुलकर्णी, सुनिल शिंदे सर्व रा. मरवडे व इतर 05 ते 10 इसम

यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून राष्ट्रीय महामार्ग क्र.561-A चे चौपदरीकरणाच्या अनुशंगाने मरवडे गावातून जाणारा प्रस्तावित महामार्ग गावाच्या मुख्य वस्तीच्या बाहेरून नेण्याकरीता रास्ता रोको अंदोलन करून जाणारी-येणारी वाहतूक आडवून

मोठमोठ्याने घोषणा देत जिल्हाधिकाय्राच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126(2), 189(2), 190 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे फिर्याद आहे. वास्तविक पाहता.
या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे गावातील प्रमुख मंदिर महापुरुषाची स्मारके मशानभूमी बाधित होणार असून ते टाळण्यासाठी ग्रामस्थांनी संबंधित खात्याला निवेदन देऊन सनदशीर मार्गाने आंदोलन करून देखील पोलिसांनी यावर गुन्हा दाखल केल्या प्रकरणात

ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला दोन वर्षांपूर्वी पिके जळत असताना उजनी कालव्याचे पाणी मागितल्याप्रकरणी शेतकऱ्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. सनदशील मार्गाने न्याय मागणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची संबंधित विभागाची जबाबदारी नाही का ?
शिवाय त्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ काय येऊ दिली यावर संबंधित खात्यावर देखील जनतेच्या मागणीवर दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला पाहिजे असा सूर या निमित्ताने समोर येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











