टीम मंगळवेढा टाईम्स : सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) आगामी संचालक मंडळ निवडणुकीचे बिगुल वाजताच तालुक्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.

सहकार क्षेत्रातील तरुणांचे लाडके नेतृत्व आणि मुंडेवाडी येथील राजलक्ष्मी महिला पतसंस्थेचे मार्गदर्शक युवक नेते लिंगाणा पाटील हे जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी दावेदारी सांगण्याच्या तयारीत आहेत.

पतसंस्था मतदारसंघातून नव्या रक्ताला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली असून, पाटील यांच्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार वर्तुळातून जोरदार मोर्चेबांधणी (फिल्डिंग) सुरू झाली आहे.

ज्येष्ठ व प्रमुख नेत्यांचे पाठबळ!
लिंगाणा पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष गाठीभेटी आणि संपर्क अभियानावर त्यांनी भर दिला आहे.

या प्रवासात त्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे, मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार प्रशांत परिचारक अशा सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचे सहकार्य व पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याचा मानस
राजलक्ष्मी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीत लिंगाणा पाटील यांचे मोठे योगदान राहिले आहे.
सहकार क्षेत्रातील आपल्या प्रत्यक्ष अनुभवाच्या जोरावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून:
शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक प्रश्न आक्रमकपणे मांडणे, पतसंस्था आणि सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करणे,

ग्रामीण अर्थकारणाला सक्षम आणि पारदर्शक बनवणे, हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आपण निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचे लिंगाणा पाटील यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातून ‘नव्या रक्ताला’ संधी देण्याचा सूर
सहकार क्षेत्रात जुन्या प्रस्थापित समीकरणांपेक्षा तरुणांच्या उत्साहाला व नवीन विचारांना संधी मिळावी, असा सूर मंगळवेढा तालुक्यातील सहकार वर्तुळातून उमटत आहे.
लिंगाणा पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे पतसंस्था मतदारसंघातील लढत अत्यंत रंजक व लक्षवेधी ठरणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










