टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झालेल्या २६ वर्षीय घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी अजय संजय खंदारे, शोभा खंदारे आणि अक्षय खंदारे (सर्व रा. मंगळवेढा) या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय महिला ही पुणे येथे ब्यूटीपार्लरचा व्यवसाय करते. इन्स्टाग्रामवरून संशयित आरोपी अजय खंदारे याच्याशी तिची ओळख झाली होती.

अजयने तिच्याशी प्रेमाचे नाटक करून “आपण लग्न करूया” असे आमिष दाखवले. १४ एप्रिल २०२२ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत त्याने पीडितेला पंढरपूर येथील लॉजवर तसेच गणेशवाडी जवळील काळ्या खडकाजवळ स्विफ्ट कारमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

विवाहाची माहिती लपवून जातिवाचक शिवीगाळ व धमकी
संशयित आरोपी अजय याने स्वतःचे लग्न झाले असल्याचे पीडितेपासून लपवून ठेवले होते. १५ ऑगस्ट रोजी पीडितेने त्याला लग्नाबद्दल विचारणा केली असता, आरोपी शोभा खंदारे आणि अक्षय खंदारे यांनी तिला अपशब्द वापरून जातिवाचक शिवीगाळ केली.

तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे करत आहेत.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
इन्स्टाग्रामवरून ओळख झालेली मंगळवेढ्यातील ही दुसरी घटना आहे. सोशल मीडियाचा (इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप) वापर करताना अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवता पूर्ण खात्री करूनच संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









