टीम मंगळवेढा टाईम्स।
आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारी एक सुखद घटना मंगळवेढा शहरात घडली आहे. येथील तरुण अक्षय ऐवळे याने रस्त्यावर सापडलेला एक महागडा मोबाईल फोन मूळ मालकाला शोधून सुपूर्द करत समाजासमोर प्रामाणिकपणाचा नवा आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे.

नक्की काय घडले?
मंगळवेढा शहरातील एका कापड दुकानात काम करणाऱ्या लक्ष्मी साखरे या महिला दररोजप्रमाणे आपले काम आटपून रात्री सुमारे ८ वाजता भाळवणी येथील आपल्या घराकडे निघाल्या होत्या. मंगळवेढ्यातील गजबजलेल्या दामाजी चौकातून जात असताना त्यांचा महागडा मोबाईल नकळत रस्त्यावर पडला.

काही वेळातच त्या मार्गावरून जात असताना अक्षय ऐवळे या तरुणाला हा मोबाईल रस्त्यावर पडलेला दिसला. मोबाईल कोणाचा आहे? याचा कसलाही विचार न करता अक्षयने तत्परता दाखवली आणि कोणताही गैरफायदा न घेता अवघ्या काही वेळातच मोबाईल कोणाचा आहे याचा शोध घेतला. फोनच्या मूळ मालक लक्ष्मी साखरे यांच्याशी संपर्क साधून अक्षयने तो मोबाईल अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्या स्वाधीन केला.

सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
आपल्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या कमाईचा मोबाईल सुखरूप परत मिळाल्यानंतर लक्ष्मी साखरे यांनी अक्षय ऐवळे याच्याबद्दल मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली.

अक्षयच्या या कौतुकास्पद आणि प्रामाणिक कृत्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. दामाजी झेरॉक्सचे मालक सचिन घंटे, सरपंच संजय कोळी, नितीन घंटे, श्रीकांत दवले आदी मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी अक्षय ऐवळे याचे विशेष अभिनंदन करून त्याच्या या प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










