टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
सांगोला-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कचरेवाडी हद्दीत लक्ष्मी नाष्टा सेंटर व बोगदा फाट्याजवळ मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका कुटुंबाला चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवून १ लाख ४ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरीने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मरवडे येथील अक्षय भिमराव जावीर (वय २९) हे आपल्या आई-वडिलांसह कार (क्र. MH 13 AC 1356) ने सांगोला बाजूकडून मंगळवेढ्याकडे मरवडेकडे जात होते.
रात्री नऊ वाजेच्या सुमारास कचरेवाडीजवळील बोगदा फाट्याजवळ त्यांची कार अचानक बंद पडल्यामुळे ते रस्त्याच्या कडेला थांबले.

त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून तीन अज्ञात इसम खाली उतरले. त्यांनी जावीर कुटुंबाला चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून दमदाटी केली. लुटमारीदरम्यान झालेल्या झटापटीत फिर्यादी अक्षय जावीर व त्यांची आई दोघेही जखमी झाले आहेत.

लुटलेला मुद्देमाल:
सोन्याचे मंगळसूत्र: ₹५०,००० (७ ग्रॅम)
सोन्याचे कर्णफुले (झुबे): ₹५०,००० (७ ग्रॅम)
रोख रक्कम: ₹४,५०० (५०० रुपयांच्या ९ नोटा)
एकूण ऐवज: ₹१,०४,५००/-

झटापट सुरू असताना महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांना संशय आल्याने ते मदतीसाठी थांबले.
नागरिकांना येते पाहून तिन्ही चोरटे पसार झाले, तर स्कॉर्पिओ चालक गाडी घेऊन सोलापूरच्या दिशेने पळून गेला.
या प्रकरणी अक्षय जावीर यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 733/2026, BNS 2023 चे कलम 309(4), 309(6), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक (APSI) कुमार ढेरे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











