टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा शहर आणि संपूर्ण तालुक्यात अवैध दारू विक्री, गुटखा आणि जुगाराचे धंदे खुलेआम सुरू असून यामुळे तरुण पिढी आणि महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनापूर्वी (१५ ऑगस्ट) हे सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद न झाल्यास

येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी मंगळवेढा ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे मंगळवेढा शहराध्यक्ष आण्णासाहेब पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

४० टक्के टक्क्याने आठवडा व्याजावर पैसे उचलले जात आहेत
निवेदनात नमूद केल्यानुसार, मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागात छोट्या पानटपऱ्या तसेच गावागावांतील मंदिरांच्या परिसरात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. तर अवैध धंद्यांमुळे तरुण वर्ग जुगाराच्या आहारी गेला असून ४० टक्के टक्क्याने आठवडा व्याजावर पैसे उचलले जात आहेत. यामुळे तरुण पिढी दारू आणि जुगाराच्या विळख्यात सापडली असून सामाजिक स्वास्थ बिघडत आहे.

स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा
अवैध धंद्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपूर्वी यावर कठोर कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा पवित्रा संभाजी ब्रिगेडने घेतला आहे.

या निवेदनाच्या प्रती पोलीस उपविभागीय अधिकारी (मंगळवेढा), तहसीलदार (मंगळवेढा) आणि मंगळवेढा ग्रामीण पोलीस ठाणे यांनाही माहितीस्तव सादर करण्यात आल्या आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












