मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना माढा तालुक्यात उघडकीस आली आहे. आजारावर उपचाराच्या बहाण्याने आणि विविध प्रलोभने दाखवून अल्पवयीन शाळकरी मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
डॉ. दत्तात्रय पांडुरंग कुलकर्णी (वय ५५, रा. माढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव असून, बार्शी सत्र न्यायालयाने त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नेमका प्रकार काय?
आरोपी डॉ. कुलकर्णी हा माढा तालुक्यातील एका खेडेगावात गेल्या अनेक वर्षांपासून ‘बीईएमएस’ (BEMS) पदवीच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत होता. गावातील रुग्ण आणि पालकांचा त्याच्यावर विश्वास होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने इयत्ता ७ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली.

उपचारासाठी दवाखान्यात आलेल्या अथवा परिसरातील शाळकरी मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून तो गेल्या काही काळापासून त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य करत होता.

पीडित मुलाच्या धैर्यामुळे पर्दाफाश
या डॉक्टरचा अमानुष आणि भयंकर प्रकार सहन न झाल्याने अखेर एका पीडित अल्पवयीन मुलाने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली. मुलाने आपबिती सांगत तक्रार दाखल केल्यानंतर या संपूर्ण काळ्या करतुतीचा पर्दाफाश झाला.

दवाखान्यातून थेट बेड्या
पीडित मुलाच्या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता धडक कारवाई केली. आरोपी डॉक्टर चालवत असलेल्या दवाखान्याच्या परिसरातूनच कुर्डूवाडी पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.

याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात आरोपी डॉ. दत्तात्रय कुलकर्णी याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो – POCSO) कायद्यासह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांकडे तपासाची चक्रे
३० जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत.

घटनेचा पुढील सखोल तपास आयपीएस अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. या स्वतः करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













