टीम मंगळवेढा टाईम्स। (विशेष प्रतिनिधी):
मंगळवेढा बसस्थानकावर चोऱ्यांची मालिका थांबता थांबत नसून प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. अरळी येथील उपकेंद्रात कार्यरत असणाऱ्या

आशा वर्कर प्रज्ञा संतोष सावंत (वय ४०, रा. अरळी) यांचा ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना नेमकी काय घडली?
३० जुलै रोजी दुपारी ४ वाजता प्रज्ञा सावंत या मंगळवेढा बसस्थानकावरून मंगळवेढा–अरळी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या पर्समधून:

३५,००० किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र
४,५०० किमतीचे चांदीचे पैंजण, ३,५०० रोख रक्कम असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल अत्यंत हुशारीने लंपास केला.
बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी
दिशाहिन कॅमेरे: बसस्थानकावर मध्यंतरी ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, कॅमेऱ्यांचे तोंड वरच्या बाजूला असल्याने बसमध्ये चढताना घडणारे चोरीचे प्रकार त्यात कैदच होत नाहीत.

पोलीस बंदोबस्ताचा अभाव: स्थानकावर पोलिसांची कोणतीही गस्त किंवा बंदोबस्त नसल्याने चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
फिरत्या (PTZ) कॅमेऱ्यांची गरज: वारंवार घडणाऱ्या चोऱ्यांमुळे आता फिरत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आणि कडक पोलीस बंदोबस्ताची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













