मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची संवाद बैठक घेतली. 29 ऑगस्टला मराठा आंदोलनाला तीन वर्ष पूर्ण होत असल्यानं जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झालेत.

29 ऑगस्टला राज्यभरात शेवटचं निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केलीये. इतकंच नव्हे तर एकतर मी तरी जाईन, नाही तर सरकार तरी जाईल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय…

मराठा समाजाच्या मागण्यांवरून मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केलीये. मात्र, मराठा समाजातील ज्यांनी जात प्रमाणपत्र मागितलं, त्यांना ते देण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. तर मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी केलेल्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत, तेही पाहुयात…

मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या
राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील सगळे प्रमाणपत्र घ्या . सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मुंबई या पाचही संस्थानच्या गॅझेटियरची अमंलबजावणी GRसहीत हवी. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. ओबीसींच्या सोई-सुविधा मराठा समाजाला लागू करा.
अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावा द्यावा. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करा. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा . SEBCचे, ESBC आणि SWSमधून निवड झालेल्यांना नियुक्त्या द्या. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या

58 लाख कुणबी प्रमाणपत्र हा जरांगेंच्या मागण्यांमधली कळीचा मुद्दा आहे. तर प्रत्येक अर्जदाराला प्रमाणपत्र दिलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणंय.

या दाव्या प्रतिदाव्यांमुळे तिढा वाढणार असून जरांगे आणि सरकारमधला संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच सरकार काही तोडगा काढणार की नेहमीप्रमाणे जरांगेंवर आंदोलनाची वेळ येणार याबाबत उत्सुकता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












