mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 19, 2026
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे शिवसेना नेते अनिल सावंत यांनी मंगळवेढा तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले.

यंदा तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संकटात सापडले असून, तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी अनिल सावंत यांनी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

​खरीप पेरण्या धोक्यात; ३५ हजार हेक्टरवर संकट

​उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात अनिल सावंत यांनी तालुक्यातील भीषण वास्तव मांडले आहे. तालुक्यात यंदा केवळ ११ टक्क्यांपर्यंतच खरीप पेरणी होऊ शकली आहे. दमदार पावसाने ओढ दिल्यामुळे सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्णपणे धोक्यात आल्या आहेत. पाऊस नसल्याने उभी पिके करपून चालली असून शेतकरी पुरता चिंताग्रस्त झाला आहे. शेतीसोबतच आता तालुक्यातील पशुधनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

​चारा टंचाई तीव्र; पशुपालक आर्थिक अडचणीत

मंगळवेढा तालुक्यात ९४ हजारांपेक्षा जास्त पशुधन असून त्यांच्यासाठी हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नाईलाजास्तव पशुपालकांना भीमा नदीकाठचा ऊस तब्बल ४ हजार रुपये प्रति टन दराने खरेदी करावा लागत आहे. दुधातून मिळणारे उत्पन्न वैरणीवरच खर्च होत असल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. यासाठी शासनाने तातडीने चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

​’जलजीवन’चे अपयश आणि म्हैसाळचा विस्कळीत पुरवठा

​तालुक्यातील पाणीटंचाईवर बोट ठेवत अनिल सावंत यांनी प्रशासकीय त्रुटींवर तीव्र आक्षेप घेतला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ची कामे अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. भोसे प्रादेशिक योजना पूर्ण क्षमतेने चालत नाही, तर आंधळगाव प्रादेशिक योजनेवर कोट्यवधींचा खर्च होऊनही गावे तहानलेलीच आहेत.

तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून दक्षिण भागातील गावांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने या भागातील साठवण तलाव तातडीने भरून देण्याची गरज आहे. पाणी नसलेल्या गावांमध्ये तातडीने शासकीय टँकर सुरू करावेत, अशी मागणी सावंतांनी केली.

​मजुरांच्या हाताला काम द्या; वीज पुरवठा सुरळीत करा

भीमा नदीकाठच्या शेतीला नियमित व पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने पिके जळून खाक होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम नसल्याने शासनाच्या १२५ दिवस रोजगार देण्याच्या हमी योजनेअंतर्गत गावात तातडीने सार्वजनिक विकासकामे सुरू करावीत, जेणेकरून मजुरांचे स्थलांतर थांबेल, असे निवेदनात नमूद केले आहे.

​निर्णायक बैठकीला मान्यवरांची उपस्थिती

​निवेदन देताना अनिल सावंत यांच्यासोबत मंगळवेढा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फरभाई काझी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंदवे, सिताराम भगरे, संजय लेंडवे, सुनील चेळेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

​मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक सध्या अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने संवेदनशीलतेने विचार करून तालुक्याला तातडीने ठोस प्रशासकीय व आर्थिक मदत द्यावी, अशी जाहीर अपेक्षा अनिल सावंत यांनी व्यक्त केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 20, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
Next Post
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी 'यांची' निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 20, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..